जामखेडमध्ये ग्रामसेवकाने लाच मागितली ,  शेतकरी देखील तोडीस तोड भेटला अन.. 

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यात समोर आलेला असून दोन जणांच्या विरोधात याप्रकरणी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व्यक्ती हा ग्रामसेवक असून त्याच्यासोबत गुन्हा दाखल झालेला दुसरा व्यक्ती हा चक्क प्राध्यापक म्हणून काम करत आहे . 

उपलब्ध माहितीनुसार , नेताजी शिवाजी भाबड ( वय पन्नास वर्ष ग्रामसेवक वर्ग तीन वाघा ग्रामपंचायत जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर ) आणि शामराव माणिकराव बारस्कर ( वय 53 धंदा नोकरी प्राध्यापक जामखेड महाविद्यालय जामखेड राहणार वाघा पोस्ट नान्नज तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

तक्रारदार व्यक्ती यांच्या पत्नीच्या नावाने वाघा इथे गट क्रमांक 114 मध्ये दोन हेक्टर क्षेत्र असून त्या जागेवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरता प्रस्ताव त्यांनी तयार करून ग्रामपंचायत वाघा येथे सादर केलेला होता . सदर विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्यासाठी आरोपी लोकसेवक ग्रामसेवक व इतर खाजगी इसम हे लाच मागत असल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय अहमदनगर यांच्याकडे 22 तारखेला तक्रार दाखल करण्यात आलेली होती. 

22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी रोजी लाचेची मागणी झाल्याचे समोर आल्यावर लोकसेवक नेताजी शिवाजी भाबड आणि आरोपी खाजगी इसम शामराव माणिकराव बारस्कर या दोघांनी पंचासमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली आणि 28 तारखेला सापळा रचत दोघांनाही. रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे जामखेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . 

शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक , माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. 


शेअर करा