नगर हादरलं..शिवसेनेच्या शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखावर बलात्काराचा गुन्हा

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि गर्भवती झाल्यानंतर तिच्या पोटावर लाथा मारत गर्भपात देखील करण्यात आला. सदर प्रकरणी नगर शहरातील शिंदे गटाचा संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन जाधव याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीच्या विरोधात कलम 376 376 2 एन 315 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सचिन जाधव याची आणि पीडित महिलेची फेसबुकच्या माध्यमातून 2020 मध्ये ओळख झालेली होती.  सचिन याने महिलेसोबत ठिकठिकाणी तिला घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे काही फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने तिला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू लागला. 

सचिन याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने अखेर नगर सोडले आणि काही दिवस ती पुण्याला जाऊन राहू लागली . पुण्यात तिचा खर्च भागत नसल्याकारणाने अखेर ती पुन्हा नगरला आली . सचिन याला याची माहिती कळाली आणि त्याने मोबाईलवरून तिच्यासोबत संपर्क साधला आणि पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण सुरू केले. 

सदर प्रकाराने महिला गर्भवती राहिली त्यावेळी त्याने लग्न टाळण्याच्या उद्देशाने गर्भपात करण्यासाठी तिचा छळ सुरू केला. आरोपी सचिन याने तिच्या पोटावर लाथा मारल्या त्यामुळे तिचा गर्भपात देखील झाला त्यानंतर देखील आरोपी सचिन हा तिचे वेळोवेळी लैंगिक शोषण करत असायचा. दरम्यानच्या काळात पीडित महिलेला एक मुलगा झाला आणि मुलाला ठार मारेल अशी धमकी देत पीडितेचे लैंगिक शोषण सुरू होते. पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सचिन याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे . 


शेअर करा