पप्पा आज मैत्रिणीच्या होस्टेलवर थांबते , बारावीच्या पेपरला गेली अन.. 

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून बारावीला पेपरला गेलेल्या एका मुलीने वडिलांना फोन करून मैत्रिणीकडे थांबते असे सांगितले आणि रात्रीतून ही मुलगी बेपत्ता झालेली आहे . अज्ञात व्यक्तीने तिला रिक्षातून पळून नेल्याचा प्रकार सव्वीस तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडलेला आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सदर मुलगी ही बारावीचा पेपर देण्यासाठी जात आहे असे सांगून घराबाहेर पडलेली होती. रात्री दहा वाजता तिने वडिलांना फोन करत मी आज मैत्रिणीकडे होस्टेलवर थांबत आहे असे वडिलांना फोनवर सांगितले आणि त्यानंतर रिक्षातून एका अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले .पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून मुलीचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे . 


शेअर करा