‘ आज तुला लटकवतोच ‘ , राहुरीत बायकोच्या गळ्यात दोरी बांधली अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरीत समोर आलेली असून कौटुंबिक वादातून आणि पत्नीवर संशय घेतल्यानंतर राहुरी खुर्द इथे एका पतीने पत्नीला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे . राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जयश्री सोमनाथ गायके ( वय 27 राहणार इरिगेशन कॉलनी राहुरी खुर्द ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून जयश्री पती सोमनाथ , मुलगा अभय यांच्यासोबत एकत्र राहतात . डाव्या हाताने जयश्री अपंग असून सोमनाथ याला दारू पिण्याचे व्यसन आहे त्यामुळे दारू पिऊन आल्यानंतर तो सातत्याने त्यांच्यासोबत वाद घालत असायचा. 

सोमनाथ धुळे इथे नोकरीला असून 22 तारखेला तो आला त्यावेळी त्याच्या खिशात आक्षेपार्ह वस्तू आढळल्या म्हणून पती-पत्नीत वाद झाला त्यावेळी त्याने आज मी तुला स्वतःच्या घराच्या छताला लटकवून मारून टाकेल असे म्हणत त्यांच्या गळ्यात दोरी बांधून ओढली . आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यानंतर जयश्री यांची सुटका केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  


शेअर करा