चुलत दिराचा वहिनीवर घरात घुसून अत्याचार , पती बाहेर गेल्याचं हेरलं अन.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम इथे एका चुलत दिराने भर दिवसा घरात घुसून भावजय एकटी असताना तिच्यावर अत्याचार केलेला आहे . करमाळा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , केम येथील ही विवाहित महिला घरात एकटी होती. तिचा पती मजुरी आणि चार चाकी वाहन चालवत असल्याने तो बाहेरगावी गेला होता याची संधी साधत विवाहितेचा चुलत दीर घरात घुसला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. 29 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. आरोपीने तिला कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. 

विवाहित महिला त्यानंतर घाबरून गेली आणि कुणाला काही सांगितले नाही त्यानंतर अकरा फेब्रुवारी रोजी आरोपी पुन्हा संध्याकाळी पाचच्या सुमारास तिच्या घरी आला . महिलेचा पती घरी भाजी आणण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याने पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार केला त्यावेळी तिने आरडाओरडा केला. सासू-सासरे घरात आले त्यावेळी आरोपी चुलत दीर हा पळून गेलेला होता. 

पती घरी आल्यानंतर पतिला पत्नीने हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर सासू-सासरे आणि पती या सर्वांनी करमाळा पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात अत्याचार विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव या प्रकरणी तपास करत आहेत. 


शेअर करा