भाजप नेते नितेश राणे यांच्या पुण्यातील मालमत्तेवर पुणे महापालिकेने कारवाई केलेली असून डेक्कन भागात व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केलेली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई थकबाकी प्रकरणी केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सदर जागेवर तब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकीत करप्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत असून महापालिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केलेली आहे.