तुम्ही कुणाचे नातेवाईक आहात म्हणून.., रोहित पवारांवर कारवाईचा इशारा 

शेअर करा

तलाठी भरती प्रक्रिये बाबत भ्रष्टाचार झाल्याची टीका रोहित पवार यांनी केलेली होती त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केल्याचे विधान नगर इथे बोलताना केलेले आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , ‘ तुम्ही एखादे बेताल वक्तव्य करता मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा. तुम्ही कुणाचे नातेवाईक आहात म्हणून काहीही बोलण्याचे तुम्हाला लायसन्स मिळालेले नाही . पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवाने ती परंपरा पुढे नेण्याचे ठरवलेले आहे. महसूल विभागामार्फत आम्ही गुन्हा दाखल करणे विषयी कार्यवाही सुरू केलेली असून पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असे म्हटलेले आहे. 


शेअर करा