वडील नाहीत आई देखील आजारी , अपघात झाल्याने तरुणाला मदतीची गरज 

शेअर करा

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा अपघात झालेला असून त्याच्या उपचारासाठी दहा ते पंधरा लाख रुपयांची गरज आहे. काम करून शिक्षण घेणारा आष्टी येथील तरुण वैभव सुनील इंगवले असे या तरुणाचे नाव असून लिंपणगाव येथे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झालेला असून पुण्यात एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत . 

वैभव याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आलेले आहे. त्याच्या उपचारासाठी दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून वैभव याला वडील नाहीत तर आई कॅन्सरने आजारी आहे. 

श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा शहरात मदत जमा केली आणि अग्निपंख फाउंडेशनने 11000 रुपयांची मदत त्याला दिली.  वैभव याला मदत करणाऱ्या व्यक्तींनी 97305 65518 या गुगल पे नंबर वर मदत करावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. 


शेअर करा