
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा असला तरी अनेक जण अद्याप देखील अंधश्रद्धेच्या अधीन झालेले पाहायला मिळत आहेत . असाच एक प्रकार हिंगोलीत समोर आलेला असून गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरात जादूटोणा करण्यासाठी तब्बल दहा ते बारा फूट खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आलेला आहे . सुदैवाने या प्रकरणात आत्तापर्यंत कुठला आघोरी प्रकार घडलेला नाही मात्र सात जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील तुप्पा इथे हा प्रकार समोर आलेला असून 27 फेब्रुवारी रोजी शिवप्रसाद आत्माराम सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीने घरात खड्डा खोदला होता. गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले असून पोलिसांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती .
सदर प्रकरणी काशिनाथ जुमडे , दौलतखान पठाण , चंद्रभान इंगोले , मन्सूर खान पठाण , गुल शराबी पठाण , वर्षा शिवप्रसाद सूर्यवंशी हे जादूटोण्याचा वापर करत खड्डा खोदत असल्याचे आणि गुप्तधनाचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे.