महिला म्हणते भागाजी घरी यायचा अन.., आरोपीवर गुन्हा दाखल 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर इथे महिलेसोबत झालेल्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपीने महिला घरात एकटी असताना तिच्यासोबत फोटो काढला आणि त्या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. 

उपलब्ध माहितीनुसार , भागाजी बारकू भांड असे आरोपी व्यक्तीचे नाव असून महिलेसोबत ओळख झाल्यानंतर तू तिच्या घरी जा ये करू लागलेला होता. त्याने महिलेसोबत फोटो काढला आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेल असे म्हणत तिच्यावर  एकदा अत्याचार केला. 

आरोपी त्यानंतर अनेकदा तिच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार करत असायचा . त्याच्याकडून असाच प्रकार होत असल्याने महिलेने अखेर पतीला ही बाब सांगितली आणि पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात जात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा