मॅट्रिमोनी संकेतस्थळाच्या ओळखीचा सायबर पोलिसात शेवट , तरुणी म्हणतेय की.. 

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून मॅट्रिमोनी संकेतस्थळावर झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडलेली आहे. विवाहाच्या आमिषाने एका भामट्याने तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक केलेली असून 24 तारखेला हा प्रकार समोर आलेला आहे. पीडित तरुणी सध्या कोथरूड भागात वास्तव्याला आहे. 

फिर्यादी तरुणीचे लग्न जमत नसल्याकारणाने तिने विवाह संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेली होती त्यावेळी एका तरुणाने तिच्यासोबत ओळख वाढवली आणि मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी इच्छुक आहे असे सांगत ओळख झाल्यानंतर तिला चार लाख रुपयांना गंडवले आहे .

आरोपीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर तो वापरत असलेले चार ते पाच मोबाईल नंबर बंद झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने सायबर पोलिसात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा कोथरूड पोलिसात वर्ग केलेला आहे. 


शेअर करा