मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच बनावट स्वाक्षरी केली अन.., असं आलं उघडकीस 

शेअर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याचे एक गंभीर प्रकरण सध्या मुंबईत समोर आलेले असून कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आलेले आहे . मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार करण्यात आलेली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यासहित असलेली निवेदने आणि पत्रे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ई प्रणालीमध्ये यांची नोंद केली जाते आणि संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवली जातात. 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सचिवालय इथे प्राप्त झालेल्या तब्बल दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद आणि बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलेले आहे त्यानंतर ही बाब वरिष्ठापर्यंत गेली आणि अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.


शेअर करा