नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारातील आठ आरोपी कोण ? , सध्या न्यायालयीन कोठडीत

शेअर करा

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला मनोज फिरोदिया आणि प्रवीण लहारे या दोघांची रवानगी अखेर आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे . संदीप मिटके यांची नाशिक शहरात बदली झाल्यानंतर सध्या परिस्थितीत या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. 

नगर अर्बन बँकेचा तत्कालीन कर्ज तपासणी अधिकारी असलेला मनोज वसंतलाल फिरोदिया ( वय 56 राहणार सारसनगर अहमदनगर ) आणि कर्जदार असलेला प्रवीण सुरेश लहारे ( वय 42 राहणार एकनाथ नगर केडगाव ) यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले त्यावेळी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे. 

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीए म्हणून काम करणारा शंकर घनश्यामदास अंदाणी याला अटक केलेली होती आणि त्यानंतर फिरोदिया आणि लहारे यांना देखील अटक करण्यात आली. ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाने यापूर्वीच सांगितले असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मालमत्तेचीच माहिती गोळा करत आहेत मात्र हा तपशील न्यायालयासमोर लवकरात लवकर देणे हे ठेवीदारांना जास्त दिलासादायक राहणार आहे. 

आत्तापर्यंत या प्रकरणात आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून प्रवीण जगन्नाथ पाटील ( वय 55 राहणार सावेडी अहमदनगर ),  राजेंद्र शांतीलाल लुणिया ( वय 56 राहणार कोठी रोड अहमदनगर ), मनेश दशरथ साठे ( वय 56 राहणार सारसनगर अहमदनगर ), अनिल चंदुलाल कोठारी ( वय 65 राहणार माणिक नगर अहमदनगर ), अशोक माधवलाल कटारिया ( वय 72 राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर ) शंकर घनश्यामदास अंदाणी ( वय 45 राहणार सावेडी अहमदनगर ), मनोज वसंतलाल फिरोदिया ( वय  56 राहणार सारसनगर आणि कर्जदार प्रवीण सुरेश लहारे ( वय 42 राहणार एकनाथ नगर केडगाव ) अशी आरोपींची नावे आहेत. 


शेअर करा