नगरमध्ये कुलकर्णी काकांना भामट्याने लावला चुना , काकांची सायबर पोलिसात धाव 

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या नगर शहरात समोर आलेला असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देतो असे आमिष दाखवत एका बँक कर्मचाऱ्याला तब्बल 24 लाख 25 हजार रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात हा प्रकार घडलेला असून सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , रजत सिंग राजपूत ( पूर्ण नाव माहित नाही ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात अमित नंदकिशोर कुलकर्णी ( राहणार बालिकाश्रम रोड सावेडी ) यांनी फिर्याद दिलेली आहे . 

अमित कुलकर्णी हे एका बँकेमध्ये नोकरीला असून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करा..  तुम्हाला आकर्षक परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवत रजत सिंग राजपूत याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते . सहा जानेवारीपासून तर 5 फेब्रुवारी पर्यंत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी फिर्यादी यांनी 24 लाख रुपये दिले मात्र नफा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली . फिर्यादी यांनी त्यानंतर सायबर पोलिसात धाव घेतली आहे. 


शेअर करा