38 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ओळख पटवली , आरोपी अखेर गजाआड

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण पुण्यात समोर आलेले असून डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाला वारजे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. विनयभंग करून आरोपी तेथून फरार झालेला होता मात्र पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळख पटवत ताब्यात घेतले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , व्यंकटेश त्रिंबक फोपळे ( वय 19 वर्ष राहणार साई कॉलनी आम्रपाली हॉटेल जवळ वारजे मूळ राहणार जिल्हा बीड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  एका डॉक्टर तरुणीने त्याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. 

तक्रारदार तरुणी ही चार दिवसांपूर्वी वारजे भागातून निघालेली होती त्यावेळी आरोपी फोपळे याने तिचा पाठलाग सुरू केला आणि तिच्यासमोर अश्लील कृत्य करून त्यानंतर तो पसार झाला . पोलिसांनी वेगवेगळ्या भागातील 38 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यानंतर आरोपीची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या . पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे  यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. 


शेअर करा