रोजच कटकट..अखेर अल्पवयीन मित्राची मदत घेऊन वडिलांच्या प्रेयसीला संपवले : कुठे घडली घटना

  • by

अनैतिक संबंधामुळे पती-पत्नीत नेहमीच होणाऱ्या भांडणाचा राग मनामध्ये ठेवून मुलानेच वडिलांची प्रेयसी असलेल्या आशाबाई शेषराव गांगुर्डे या महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वडनेर या गावी गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना जेरबंद केले आहे. यातील दोन जणांना न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून तिसऱ्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. With the help of a minor friend, he ended his father’s sweetheart extra marital affair women

उपलब्ध माहितीनुसार, मयत महिला आशाबाई शेषराव गांगुर्डे हिचे आरोपी रवी याचे वडील बाळू वाघ यांच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे वाघ पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत असत त्यामुळे बाळू वाघ याचा मुलगा रवी त्याला राग यायचा. या रागाचे पर्यावसान त्याने बालवयीन मुलाच्या साथीने आशाबाई शेषराव गांगुर्डे यांना नदीकाठच्या शेतात बोलावले आणि कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांचा खून केला.

मयत महिलेचे पती शेषराव बाबाराव गांगुर्डे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . शेषराव गांगुर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी साडेनऊच्या सुमारास कामासाठी घरातून बाहेर पडलो. संध्याकाळी घरी परतला असता माझ्या मुलाने ही घटना मला सांगितली.गावातील महिला कामावरून परतताना त्यांनी वडनेर शिवारातील नदीजवळील स्वप्निल राठोड यांच्या शेतात आशाबाई जखमी अवस्थेत पडलेली असल्याचे मुलगा अमन याला सांगितले. अमन याच्या सांगण्यावरून मी घटनास्थळी गेलो असता आशाबाई रक्तबंबाळ अवस्थेत आढळली अशी शेषराव यांनी म्हटले आहे.