अकोले तालुक्यात विषबाधा झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू , डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासात..

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून राजूर परिसरातील मवेशी इथे विषबाधा झालेल्या प्रकरणात उपचार घेऊन घरी गेलेल्या एका वृद्ध महिलेचे एक तारखेला निधन झालेले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र विषबाधा प्रकरणात उपचार घेऊन त्या घरी गेलेल्या असल्याकारणाने शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , वेणूबाई रामचंद्र भांगरे ( वय 62 राहणार मवेशी करवंद दरा ) असे मयत महिला यांचे नाव असून वेणूबाई या सकाळी पोटात दुखत असल्याने मावशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या होत्या. त्यांना बरे वाटत असल्याने गुरुवारी 29 तारखेला त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला होता. 

शुक्रवारी सकाळी त्यांना त्रास जाणू लागला आणि त्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला . राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले असून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. राजुर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. 


शेअर करा