महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एकाच घरात राहणाऱ्या समवयस्क अल्पवयीन मुला मुलीने अश्लील व्हिडिओ पाहून शारीरिक संबंध ठेवले आणि तीन महिन्यांपर्यंत त्यांचा हा प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सुगावा न लागू देता सुरू होता मात्र त्यानंतर मुलीच्या पोटात दुखू लागले आणि सोनोग्राफीमध्ये ती गर्भवती असल्याचे समोर आलेले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रकरण असून सोनोग्राफी केली त्यावेळी मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले . शिक्षणासाठी आत्याकडे मुलीचा मामेभाऊ राहत होता आणि आत्याची मुलगी घरात खेळत असायची . दररोज शाळेत जाणे येणे आणि अभ्यास करणे यामध्ये ते व्यस्त असल्याचा कुटुंबीयांचा समज झाला आणि त्यांना कुठलाच संशय आला नाही.
अचानक मुलीला उलट्या आणि मळमळ सुरू झाली आणि दवाखान्यात तिला तपासणीसाठी नेले त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि सोनोग्राफीमध्ये ती तीन महिन्यांची गर्भवती आढळून आली. मुलीच्या तक्रारीवरून अल्पवयीन मामेभावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .