‘ माझ्यात दम आहे एकट्याने खून केला ‘   कॉलर उडवत अल्पवयीन मुलाने बनवला व्हिडिओ

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे. एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केला आणि त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला असताना व्हिडिओ काढून या प्रकाराची कबुली दिली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर देखील अपलोड केला. 26 तारखेला रात्री पावणे बाराच्या सुमारास चाकण आंबेठाण रस्त्यावरील सौंदर्य सोसायटी जवळ हा प्रकार घडलेला आहे. दोन अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे . 

उपलब्ध माहितीनुसार , प्रणव शंकर लोंढे ( वय 17 राहणार अमृत नगर मेदनकरवाडी चाकण ) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी रघुनाथ मारुती लोंढे ( वय 65 राहणार चाकण ) यांनी फिर्याद दिलेली आहे . खून करणाऱ्या 17 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

तीन मुले सोमवारी रात्री मद्यपान करण्यासाठी बसलेली होती त्यापैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार होते याच दरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि वाद सुरू झाल्यानंतर एका आरोपीने दुसऱ्या सराईत गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून केला आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीला या प्रकाराचे शूटिंग काढण्यात सांगितले आणि तो व्हिडिओ मोबाईलवर अपलोड केला. चाकण पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. 

विशेष म्हणजे आरोपीने खून केल्यावर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आणि त्यानंतर कॉलर उडवत स्वतःचे नाव घेऊन माझ्या दम आहे मी एकट्याने मर्डर केला , असे म्हणत खुनाची कबुली दिली आणि तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला . पोलिसांनी संबंधित व्हिडिओ डिलीट केला मात्र तोपर्यंत हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला होता. 


शेअर करा