नवऱ्यासोबत दिल्ली सोडली , प्रियकराच्या आठवणीत व्याकुळ महिलेने अखेर.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची बायकोने प्रियकराच्या मदतीने दिल्लीतील गुंडांना सुपारी देऊन भर रस्त्यात हत्या केलेली आहे . ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पश्चिम येथील हे प्रकरण असून एकूण चार जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. तीन आरोपी दिल्ली येथील असून सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे

उपलब्ध माहितीनुसार , रमेश झा ( वय 48 वर्ष ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून ते अंबरनाथ एमआयडीसी इथे एका कंपनीत कामगार म्हणून काम करत असायचे. अंबरनाथ पश्चिम येथील सर्वोदयनगर भागात आरोपी सुमनदेवी आणि दोन मुलांसोबत ते राहत होते . अंबरनाथ बदलापूर रोडवरील एका ढाब्यासमोर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची चाकूने भोसकून हत्या केली आणि  26 फेब्रुवारी रोजी मयत व्यक्ती यांच्या चोवीस वर्षीय मुलाने अंबरनाथ पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली होती. 

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी सुमनदेवी हिचे गेल्या दहा वर्षांपासून दिल्ली येथील धर्मवीर गुप्ता नावाच्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याची बाब समोर आली.  2022 मध्ये सुमनदेवी ही तिच्या प्रियकराला सोडून अंबरनाथ इथे नवऱ्यासोबत आली मात्र त्यांच्या अनैतिक संबंधात रमेश हा अडथळा ठरत होता त्यामुळे बायकोने तिच्या प्रियकराला सांगून दिल्लीतील दोन गुंडांना हत्येची सुपारी दिली. 

दिल्लीतील तिन्ही आरोपी हे अंबरनाथ शहरातील एका लॉजवर मुक्कामाला होते आणि पाळत ठेवून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे . बायकोसोबत चारही आरोपींना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे 


शेअर करा