चारित्र्याच्या संशयावरून प्रवासातच झाला वाद , पत्नीचा खून केला आणि..

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . पुण्यातील खडकवासला धरणाशेजारी कुडजे गावात असलेल्या एका जंगलात ही घटना रविवारी 26 तारखेला घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सोमनाथ सखाराम वाघ ( वय 53 राहणार वारजे माळवाडी )  आणि त्याची पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मयत व्यक्तींची नावे आहेत . सुवर्णा वाघ आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे

दोघे पती-पत्नी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घराबाहेर पडले आणि उत्तम नगर मार्गे खडकवासला धरणा जवळील कुडजे गावातील जंगलात गेले . रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील ट्रॅक पॅन्टने झाडाला गळफास लावून घेतला . पुतण्याने शोध घेतला त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे. 


शेअर करा