पुणे हादरलं..अल्पवयीन मुलाला खुणावताना सीसीटीव्हीत दिसला अन त्यानंतर.. 

शेअर करा

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. अपघात झाल्याचा बनाव नराधमाने केलेला होता मात्र पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पवन पांडे असे या नराधम आरोपीचे नाव असून वाकड हद्दीतून त्याने आठ वर्षाच्या मुलाचे शनिवारी रात्री अपहरण केलेले होते. रसवंती गृहात कामासाठी म्हणून तो आला आणि त्यानंतर अल्पवयीन मुलगा तिथे खेळत असल्याचे त्यांनी पाहिले . त्याच्यासोबत जवळीक साधत त्याचे अपहरण करून पाषाण तलावाजवळ अंधारात त्याच्यासोबत अत्याचार केला आणि गळा दाबून त्याची हत्या केली. 

पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी रात्री दहा वाजता पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी रसवंती ग्रहाच्या मालकाने पांडे याला फोन करून मुलाला पाहिलं होतं का ? असे विचारले त्याबद्दल त्याने नकार दिला मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये पांडे हा मुलाला खुणावताना आढळून आला . दोघेही सोबत गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसल्यानंतर पांडे याला तपासासाठी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 

आरोपी पांडे याने प्रथम माझ्याकडून अपघात झाला मी काय बोलणार म्हणून मृतदेह पाषाणमध्ये फेकून दिल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळ गाठले त्यावेळी अपघाताचा बनाव त्याने रचल्याचे स्पष्ट झाले . आरोपीने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची कबुली दिलेली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. 


शेअर करा