सात फेऱ्यांची झाली घाई ,  पुरोहिताला म्हणाला लवकर मंत्र वाच नाहीतर.. 

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून लग्नाच्या मंडपातच सात फेरे घेण्याची घाई झालेल्या एका व्यक्तीने पुरोहिताला बेदम मारहाण केलेली आहे . उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हे प्रकरण असून रामपूर गढी येथील क्लासिक रेस्टॉरंट येथे मंगळवारी एका विवाह सोहळा दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सोनू जाटव असे या प्रकरणातील आरोपी व्यक्तीचे नाव असून तो शिपाई म्हणून काम करतो. त्याचे लग्न असताना सात फेरे घेताना लवकरात लवकर मंत्र वाच म्हणून तो पुरोहितावर दबाव आणत होता मात्र पुरोहित काही ऐकायला तयार नसल्याकारणाने वाद झाला आणि शिपायाने विवेक शुक्ल नावाच्या पुरोहिताला बेदम मारहाण केली. 

पुरोहित यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा भाऊ मध्ये पडला त्यावेळी पुरोहित शुक्ल आणि त्याच्या भावाला देखील आरोपीने मारहाण केली.  मंत्र वाचत असताना पुरोहित सोनू यास मंत्रांचा अर्थ देखील समजून सांगत होता आणि सोनू काही काळ त्यांच्या पाठोपाठ मंत्र उच्चारत होता मात्र अचानक सात फेरे घेऊन लवकरात लवकर लग्न उरकावे यासाठी त्याने पुरोहितावर दबाव आणला आणि त्यानंतर पुरोहिताने विरोध केला म्हणून त्यास आरोपीने मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे . 


शेअर करा