निलंबित होऊनही लाच घेण्यासाठी आला ,  तब्बल ‘ इतके ‘ कोटी घरात अन सोनं तर.. 

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या महाराष्ट्रात समोर आलेला असून निलंबित झाल्यानंतरही लाच स्वीकारण्यासाठी कार्यालयात येऊन थांबलेला सह दुय्यम निबंधक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची लाच पकडताना पकडले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या घरावर देखील छापा टाकला त्यावेळी जी काही रक्कम सापडली ती पाहून पथक देखील चक्रावून गेले आणि नोटा मोजण्याची मशीन आणावी लागली आणि तब्बल एक कोटी 36 लाख रुपये , 28 तोळे सोने आणि 18 स्थावर मालमत्ता आरोपी तसेच त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असल्याचे समोर आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती आणि त्यांची भावजयी यांची सिल्लोड तालुक्यातील धावडा शिवारात जमीन होती आणि ती नावावर करण्यासाठी निबंधक कार्यालयात अर्ज करण्यात आलेला होता. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करून या प्रकरणातील सह दुय्यम निबंधक छगन पाटील याने पुन्हा स्टॅम्प वेंडर असलेला भीमराव खरात यांच्यामार्फत 5000 रुपयांची लाच मागीतली त्यानंतर संबंधित तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर सुरुवातीच्या मोजणीत 45 लाख रुपयांची रोकड आढळली त्यानंतर घरात धान्याचे पोते , कळशी यामध्ये देखील काही रक्कम लपवून ठेवण्यात आलेली होती. सुमारे एक कोटी 36 लाख रुपये आढळून आल्यानंतर पथक देखील चक्रावून गेले त्यानंतर अधिक तपासणीत 28 तोळे सोने आणि मोठ्या प्रमाणात आरोपीची स्थावर मालमत्ता देखील आढळून आलेली आहे. सदर प्रकरणी सध्या तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा