पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने चक्क अमली पदार्थ एमडी विकण्याचा प्लॅन केला मात्र त्याचा प्लॅन फसला आणि शनिवारी 45 कोटी रुपयांचे 45 किलो एमडी ड्रग्स त्याच्याकडून जप्त करण्यात आले. 7 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शुक्रवारी एक व्यक्ती विशाल नगर परिसरात एमडी ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती . पोलिसांनी सापळा रचला तेव्हा नमामि शंकर झा ( वय 32 मूळ राहणार बिहार ) याला अटक करण्यात आली त्यानंतर तपासाचा तपासाची सुई ही पोलीस उपनिरीक्षक असलेला विकास शेळके याच्या पर्यंत जाऊन पोहोचली.
पोलिसांना 26 फेब्रुवारीच्या रात्री हे ड्रग्स असलेले 45 किलोंचे पोते निगडी परिसरात रस्त्यावर पडलेले आढळून आलेले होते. पोलीस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण आणि मोटर चालक ईश्वर मोठे यांनी हे ड्रग पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या ताब्यात दिले आणि 45 कोटींचे हे ड्रग पाहून विकास शेळके याची नियत फिरली . गुप्त सूत्रांच्या माध्यमातून त्याचा हा बेत वरिष्ठांपर्यंत पोहोचला आणि त्याला अटक करण्यात आली.