मोदी फॉलो करत असलेल्या गुजरातच्या तरुणाला सुरतमध्ये घूसून उचलले, आदित्य ठाकरेंबद्दल ‘ आक्षेपार्ह ‘ उल्लेख

  • by

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या आयटी सेलच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांना ‘बेबी पेन्ग्विन’ म्हणणारा गुजराती युवक समित ठक्कर याला पोलिसांनी अटक केली आहे. Police arrested one person in Gujarat for making offensive remarks about Aditya Thackeray

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून त्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल याआधी देखील आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.समित ठक्कर याला रविवारी पोलिसांनी राजकोट येथे अटक केली. आरोपीला आज (सोमवारी) नागपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहेत. समित यानं ट्वीट करून आदित्य ठाकरे यांना ‘बेबी पेन्ग्विन’ म्हणून खोचक टीका केली होती.मुंबई आणि नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आरोपी समित ठक्करचे ट्विटरवर हजारो फॉलोअर्स आहेत. त्याची फॉलोअर्सची संख्या 60 हजारांच्या घरात आहे. तर भाजपचे अनेक मात्तबर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटरवर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. एवढंच नाही तर समित ठक्कर याचं नाव समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील त्याची पाठराखण केली होती.

युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा धर्मेंद्र मिश्रा यांनी केला आहे. समित ठक्कर यांच्यासारखे असे अनेक भाजपचे ट्रॉलर्स ट्विटरवर कार्यरत असून आज काय ट्रेंड करायचे याच्या सूचना आल्यानंतर ते सक्रिय होऊन काम करतात . अशा ट्रॉलर्सने खोट्या बातम्या पसरवणे, एखाद्याच्या चारित्र्यहनन करणे यासाठी महिलांच्या नावाने देखील लाखो फेक अकाऊंट बनवली गेलेली आहे .

धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी व्ही. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दाखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो, असं त्यानं तिथून पळून सुरतला गेला होता .

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सुरुवातीला समित ठक्कर याला त्याचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांसमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीदेखील कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही. ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने पुन्हा आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.

समित ठक्कर याला हे आदेश 16 ऑक्टोबर रोजी दिले. मात्र त्याने हा गुन्हा रद्द करावा म्हणून नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समित ठक्कर याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

समित ठक्कर याला उचलताच ट्विटरवर त्याच्या आक्षेपार्ह अशा ट्विट्स आणि कमेंट्सची पाठराखण करणारी महाराष्ट्रद्रोही टोळी सक्रिय झाली असून समित ठक्कर याला वाचवण्यासाठी महाराष्ट्रद्रोही सक्रिय झालेले आहेत. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका करायची आणि कारवाई करताच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून बोंबा मारायला सुरु करायचे हे भाजप समर्थक व्यक्तींचे नेहमीचे काम झालेले आहे . एका ठराविक पातळीपर्यंत टीका आणि विरोध ठीक आहे पण कित्येकदा राहूल गांधी, ठाकरे कुटुंबीय याच्या घराच्या व्यक्तींपर्यत देखील टीका केली जाते हे कितपत योग्य आहे ?