कोव्हीड सेंटरमधून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी असली ‘ अजब ‘ दिली जातात कारणे

शेअर करा

डॉक्टर साहेब.. म्हशीचे दूध काढायला कोणी नाही आतातरी रुग्णाला लवकर डिस्चार्ज द्या, नातेवाईकांचा हा अजब आग्रह ऐकून औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि खुद्द डॉक्टर देखील चक्रावून गेले आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसताना क्षणभर काय बोलावे आणि काय नाही हे देखील डॉक्टरांना सुचले नाही परंतु उपचारासाठी जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागतीलच, असे सांगत डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांची बोळवण केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कोव्हीड सेंटरमध्ये विविध कारणे दाखवत रुग्णाला लवकर डिस्चार्ज मेळावा यासाठी अजब कारणे पुढे केली जात आहेत. Reasons are given to get the patient out of the covid center

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातील सेंटरमध्ये कोरोना सेंटरमध्ये कन्नड येथील एक रुग्ण दाखल असून त्याला सुट्टी देण्यासाठी हा आग्रह केला गेला. या आग्रहाची जिल्हा रुग्णालयात चांगलीच चर्चा रंगली होती. जिल्हा रुग्णालयात सौम्य अवस्थेतील दाखल रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. अशा रुग्णांना फारसा त्रास जाणवत नसतो तरीही रुग्णाला किमान सात ते दहा दिवस उपचार घेणे गरजेचे असते, असे असताना रुग्णाला लवकर सुट्टी देण्यासाठी सांगण्यात आलेली जब कारणे खालील प्रमाणे असतात

लवकर सुट्टी देण्यासाठी नातेवाइकांनी सांगितलेली अजब कारणे

  • ड्युटीवर रुजू व्हायचे आहे
  • मुलीला सासरी पाठवायची आहे
  • आईवडिलांनी रुग्णालयात आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे
  • घरी लहान मुलाचा सांभाळ करायला कोणी नाही
  • काहीही त्रास नाही उगाच का दाखल केले आहे आणि सोडत का नाही

सदर विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी, ” रुग्णाला सुट्टी देण्यासाठी नातेवाईक अनेक कारणे सांगतात परंतु रुग्णांनी सुट्टीची घाई करता कामा नये, उपचार पूर्ण झाल्यानंतर सुट्टी दिली जाते. सुट्टी झाल्यानंतर घरी गेल्यानंतर देखील काही दिवस काळजी घेण्याची गरज असते “


शेअर करा