‘ जर तुला दुकान नीट चालवायचे असेल तर ‘.. गुंडाच्या ‘ अजब ‘ मागणीला वैतागून दुकानदार पोलिसात

शेअर करा

व्यावसायिक लोकांना हप्ते मागून आपली भाईगिरी सिद्ध करण्याची पद्धत पूर्वी मुंबईत होती मात्र आता अशा भाईगिरीचे नाशिक शहरात देखील पेव फुटले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील एका मिठाईच्या दुकानदाराला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. In Nashik, a young man was caught beating a shopkeeper

पोलिसांनी त्या खंडणीखोराला बेड्या ठोकल्या असल्या तरी असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची आत्ताच गरज आहे. मिलिंद नगर येथील पंचम स्वीट नावाच्या मिठाईच्या दुकानात संशयित आरोपी किरण हलवार ( राहणार मिलिंद नगर ) याने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकानात येऊन फिर्यादी धनाराम हंसारामजी चौधरी ( वय 37 राहणार राहुल अपार्टमेंट उपनगर ) यास धमकावून ‘ तुला दुकान नीट चालवायचे असेल आमच्या गॅंगला पाच हजारांचा हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुला दुकान चालू देणार नाही आणि जर पोलिसांकडे तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही ‘ अशी धमकी दिली. गॅंगसाठी पाच हजारांची मागणी करत पाचशे रुपये रोख घेऊन संशयित आरोपी किरण हा निघून गेला मात्र त्यानंतर देखील पुन्हा येऊन त्यांनी उर्वरित पैशाची मागणी केली.

उर्वरित पैशाच्या मागणीसाठी तो आला असता मिठाईच्या दुकानांमध्ये पदार्थ ठेवलेल्या ट्रेची त्याने आदळआपट केली आणि चौधरी यांना देखील मारहाण केल्याचे चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ गुन्हा दाखल केला असून किरणला शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अटक केली आहे त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे


शेअर करा