फेसबुक व्हाट्सऍपने कामाची गरजच संपवली..रोहयोच्या कामाकडे तरुणांची पाठ : पहा आकडेवारी

शेअर करा

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाची 30 ते 40 वयोगटातील नागरिकांनाच सर्वाधिक कामाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र ३० च्या आतील तरुणांनी या कामाकडे पाठ फिरवली आहे. नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर जाणे हे बेरोजगार तरुणांना एक तर कमी दर्जाचे वाटत असावे किंवा त्यांच्याकडे यापेक्षा जास्त रोजगार देणारे दुसरे काही काम हातात असावे किंवा दिवसभर मोबाईलवर टाईमपास करत काम करण्याची इच्छाच नसावी असे चित्र नगर जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संकेतस्थळावर रोजगाराची माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये रोजगार हमी योजनेत 30 ते 40 वयोगटातील काम करणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. वय 18 ते 30 हा वयोगट उमद्या तरुणांचा असून त्यांनी मात्र या कामाकडे पाठ फिरवली आहे. नगर जिल्ह्यामध्ये या वयोगटातील केवळ चार हजार तरुण काम करत असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत त्यामुळे हाताला काहीतरी काम म्हणून अनेक जणांचा ओढा रोजगार हमीच्या कामाकडे वाढलेला आहे अशा परिस्थितीत तरुणांपेक्षा मध्यम वयोगटातील लोकांकडूनच काम करण्याची मागणी वाढली आहे. नगर जिल्ह्यांमधील सद्यस्थितीमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या वयोगटात प्रमाणे 18 ते 30 वर्ष 6.28%, 31 ते 40 वयोगटात 33.18%, 41 ते 50 वयोगटात 30. 35%, 51 ते 60 वयोगटात 19.20%, 61 ते 80 वयोगटात 10.78 % तर 80 पेक्षा जास्त वयोगटात 0.22 % अशी आकडेवारी आहे.


शेअर करा