कॉलेजच्या गेटबाहेर गोळी झाडून तरुणीची हत्या, भाजपा नेत्याकडून ‘ लव्ह जिहाद ‘ चा पुरावा म्हणून व्हिडीओ शेअर

शेअर करा

मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाचे तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणा इथे फरीदाबाद जवळील बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली असून मृत निकिता नावाची विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. सोमवारी सायंकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.कॉलेजच्या गेटबाहेरच तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपीचे नाव तौशीफ असे असून मयत मुलीचे नाव निकिता आहे. उत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा 12 वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकिताचे अपहरण देखील केले होते मात्र बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांनी ते प्रकरण आपापसात मिटवले होते.

वडिलांच्या सांगण्यानुसार, सोमवारी परीक्षा देण्यासाठी निकीता कॉलेजला गेली होती. पेपर सुटल्यानंतर सायंकाळी 4 वाजता तिची आई आणि भाऊ कॉलेजबाहेर निकीची वाट पाहत होते. त्यावेळी, अचानक एक कार तेथे आली, त्या कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी निकीताला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, तौशीफ सर्वात पुढे होता. मात्र निकिताच्या भावाला पाहिल्यानंतर तौशीफने निकीतावर गोळी झाडली. निकीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना तिच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. निकिताला दवाखान्यात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून मुख्य आरोपी तौशीफ यास पोलिसांनी अटक करण्यात आली आहे .भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जर तुम्ही समस्या स्विकारत नसाल तर, त्याचे समाधानच होणार नाही. आज निकिता बळी गेली, उद्या आणखी कोण?… असा सवाल करत लव्ह जिहाद नाकारता येणार नसल्याचं प्रिती गांधी यांनी म्हटलं आहे.


शेअर करा