हताश शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक आणि म्हणाले ….

शेअर करा

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली असून सरकारने आम्हाला खसखस व गांजा लागवडीची परवानगी दिल्यास भविष्यात शेतकरी कधीही सरकारकडे मदतीची याचना करणार नाही, असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे. Depressed farmer sends Rs 10,000 check to CM

कॅनरा बँकेच्या धनादेशासह एक निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यासाठी श्रीरामपूर तालुका प्रशासनला दिले आहे. हे निवेदन व धनादेश नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी तहसीलदारांच्या वतीने स्वीकारले आहे.नगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घोषणेनंतर विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

निलेश शेडगे हे शेतकरी संघटनेशी संबंधित असून त्यांनी एक निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी असून त्यातून कोणताही आधार मिळणार नाही. या मदतीचा आपण निषेध करत आहोत. त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला. शेतकऱ्यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे शेडगे यांनी स्पष्ट केले आहे.


शेअर करा