लॉकडाऊनमध्ये जुळलं प्रेम..ऑगस्टमध्ये लग्न आणि ऑक्टोबरमध्ये अमानुषपणे हत्या : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर कोरोनाने सर्वांना घरातूनच काम करण्याची पाळी आणली मात्र याच दरम्यान एका तरुणाचे आणि तरुणीचे प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न देखील केले मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात त्याने तिची अमानुषपणे हत्या केली. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउनदरम्यान एक तरुण-तरुणी प्रेमात पडले..त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचं लग्नही झालं. यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला की मंगळवारी रात्री पतीने पत्नीची हत्या केली. यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात गेला व त्याने आपला गुन्हा कबूल केला.

ही घटना इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे कुटुंबातील वादातून नवविवाहित दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतू जेव्हा त्याला जमलं नाही, त्यानंतर त्याने सुऱ्याने 22 वर्षीय पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी पतीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला. Matching love in lockdown..marriage in August and inhumane murder in October in Madhya pradesh

मयत झालेली मुलगी अंशू हिचे कुटुंबीय तिचा पती व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप लावत असून पोलीस सासरच्या दबावामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केल होत. संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


शेअर करा