हॉटेलला सुरु होऊन फक्त १५ दिवस होताच हॉटेल चालकाच्या नशिबी ‘ असाही ‘ राजयोग : का घडले असे ?

शेअर करा

काही दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये चोरी झाली होती ती आणि त्या हॉटेलमधील काही साहित्य चोरांनी चोरून नेले होते आणि तेच साहित्य नव्याने हॉटेल सुरू करणाऱ्या एका व्यावसायिकाला त्यांनी विकले मात्र जिथून चोरी झाली त्यांनी हे साहित्य बरोबर ओळखले आणि या चोरी मागचे सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश आले. पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरातील तुळापूर येथे लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या त्रिवेणी हॉटेलमधील साहित्य चोरून दुसऱ्या ठिकाणी हॉटेल सुरू केल्याचा प्रकार लोणीकंद पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी पोलिसांनी नवीन हॉटेल व्यावसायिकांसह तीन जणांना अटक करून चोरी गेलेले साहित्य जप्त केले आहे. A hotel operator in Pune was handcuffed for buying stolen hotel supplies

मनोज रामभाऊ कनीचछे ( वय 28 ) राहुल रामभाऊ कनीचछे ( वय 23 ) व विशाल मधुकर उंबरे ( वय 20 तिघेही राहणार तुळापूर ) यांना हॉटेलचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळापूर येथील त्रिवेणी हॉटेल लॉकडाऊन मध्ये बंद असल्याने आतमध्ये ठेवलेली स्वयंपाकाची भांडी, फ्रिज,एलईडी व इतर साहित्य चोरांनी चोरून नेले होते. हॉटेल चालक प्रसन्न हेगडे हे गावावरून आल्यानंतर कडीकोयंडा तोडून चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादी सोबत गुन्हे शोध पथक तपास करत असताना पिंपरी सांडस तिथे अष्टापुर-उरळीकांचन रोडवर राजयोग नावाचे हॉटेल गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झालेले असून तिथे काही जुने वापरलेले हॉटेलचे साहित्य असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली गुन्हे शोध पथकाने अचानकपणे छापा घातला असता तिथे चोरीला गेलेले साहित्य सापडले.


शेअर करा