‘ ह्या ‘ आशेने तिने इंटिमेट सीन शूट केला खरा मात्र प्रत्यक्षात घडली अकल्पनीय घटना : सविस्तर बातमी

  • by

चित्रपटात काम करण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो मात्र त्याचाच गैरफायदा घेत अनेक वेळा काम करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक देखील केली जाते . मध्य प्रदेशात एका मॉडेलला इंटिमेट सीन शूट करून तो सीन ओटीटी प्लॅटफॉर्मवरून फक्त गरजेपुरता ठेवण्यात येईल आणि एडिट करताना काढून टाकला जाईल असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात तो पॉर्न साइटवर लीक झाला होता अगदी तसाच प्रकार हा साऊथ चित्रपट अभिनेत्री सोना अब्राहम हिच्यासोबत घडला आहे . Intimate scenes shot by Sona Abraham in the movie have been released on porn sites

सोना अब्राहम हिने सहा वर्षांपूर्वी मल्याळम चित्रपट ‘फॉर सेल’ यामध्ये भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्यही होती. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीला चित्रित केलेल्या दृश्यांपैकी गरजेपुरते घेऊन उरलेली दृश्ये डिलिट केली जातील, असे सांगितले होते. चित्रिकरणादरम्यान तिच्याकडून एक दृश्य चित्रित करून घेण्यात आले मात्र तिने केलेल्या एक इन्टिमेट सीनचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली. वाईट म्हणजे सीनचे अनेक व्हिडीओ पॉर्न साइटवरही टाकले गेले. आपले असे व्हिडीओ पॉर्न साईटवर पाहताच तिला धक्काच बसला .

ही क्लिप इंटरनेटवर आल्यानंतर सोनी अब्राहमच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली व त्यांना या साइटवरुन ही क्लिप काढण्याची विनंती केली. पण या घटनेला सहा वर्षे झाली तरी अद्याप ती क्लिप इंटरनेटवरुन काढण्यात आलेली नाही. याचा परिणाम सोनाच्या वैयक्तिक आयुष्यावर होत आहे. ती मानसिकरित्या खचली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा यावर वाचा फोडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला पकडले मात्र नंतर त्याला जामीन मिळाल्याने ती खचून गेली आहे . आपण कोणाच्या सोबत काम करतो आहे आणि त्याचे या आधीचे काय रेकॉर्ड आहे याचे भान ठेवून यापुढील काळात कलाकारांनी काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे.