अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून गेलेला आरोपी धरला मात्र म्हणतो की ..

  • by

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजतात त्याने पळ काढला होता.अखेर रविवारी तो घणसोली येथे आला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. The accused, who absconded while the minor girl was pregnant, was arrested in Navi Mumbai

सुमित साह ( वय 27) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. त्याचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्याने 2018 मध्येही एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते त्याशिवाय इतरही गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीने ह्या गोष्टीचा इन्कार केला असून त्याने यात आपला दोष नसल्याचे देखील म्हटले आहे.

त्याने घनसोली गाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते. जून 2020 मध्ये या मुलीला वेदना होऊ लागल्याने तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती गरोदर असल्याचे उघड झाले यावेळी तिने दिलेल्या अत्याचाराच्या माहितीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजतात त्याने राहत्या ठिकाणावरुन पळ काढला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते अखेर रविवारी तो घनसोली परिसरात आला असल्याची माहिती समजतात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या