दोघांची होती कॉमन गर्लफ्रेंड .. ‘ त्या ‘ वसुली एजंटच्या खुनाचे रहस्य उलगडले

  • by

खाजगी बँकेचा वसुली एजंट असलेल्या एका व्यक्तीची औरंगाबाद शहरानजीक मिटमिटा परिसरात हत्या करण्यात आली होती. माँटीसिंग अनिल कुमार असे मयत व्यक्तीचे नाव होते. त्याचा खून करून फरार झालेल्या त्याच्या मित्राला छावणी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात कुरकुंभ येथे अटक केली. आपसातील वैमनस्य आणि अनैतिक संबंधातून हा खून करण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली. Mystery of the murder of recovery agent Montising Anil Kumar in Aurangabad

कपिल राजीव रापते ( वय 25 राहणार बीड बायपास परिसर ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माँटीसिंग अनिल कुमार याची 19 ऑक्टोबरच्या रात्री त्याच्या मिटमिटा येथील फ्लॅटमध्ये भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मारेकरी फ्लॅटला लॉक लावून पसार झाला होता. 21 मे रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयताचा मित्र विशाल मदन दामोदर ( राहणार पडेगाव ) यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांचा तपास सुरू असताना मयत व्यक्तीचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्याच तरुणीचे आरोपी सोबत देखील अनैतिक संबंध होते त्यावरून मयत आणि आरोपी यांच्यात जुना वाद होता आणि त्यातून त्यांच्यात वैमनस्य तयार झाले होते.घटनेच्या काही दिवसापूर्वी मयत व्यक्तीने त्याच्यासोबत राहणाऱ्या तरुणीला मारहाण केली होती आणि ही बाब आरोपी असलेल्या कपिल याला त्या तरुणीने सांगितली. त्यामुळे या दोघांमध्ये परत पुन्हा भांडण तयार झाले आणि मयत व्यक्तीने आरोपीला शिवीगाळ केली होती. याचा राग आरोपी कपिल याला आला होता आणि त्याने मयत व्यक्तीचा खून करण्याचा प्लॅन केला. 18 ऑक्टोबर रोजी रात्री कपिल मिटमिटा रोडवरील एका ढाब्यावर जेवण करायला गेला त्यानंतर जेवण आटोपून तो माँटीसिंग अनिल कुमार याच्या घरी गेला आणि त्याचा खून करून तो लगेच पसार झाला होता .