सैराट होऊन तब्बल दीड वर्षे होते गायब मात्र अखेर ‘ इथून ‘ धरले

  • by

प्रेम प्रकरणातून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसहित तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून पलायन केलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जोडप्याचा तब्बल दीड वर्षांनी छडा लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाला यश आले. सोमवारी पुणे जिल्ह्यातील महाळुंगे तालुका खेड येथून या जोडप्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यांना वडवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. couple who escaped from a love affair with a minor girl was caught in mahalunge pune

उपलब्ध माहितीनुसार, वडवणी तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलगी मे 2019 मध्ये बेपत्ता झाली होती. नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सत्यप्रेम वैजिनाथ आंधळे या तरुणाविरुद्ध वडवणी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. वडवणी पोलिसांनी सत्यप्रेम याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले, त्यामुळे हा गुन्हा तपास कामी 29 जुलै 2020 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला या पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक राणी सानप यांनी आरोपी सत्यप्रेम आंधळेच्या शोधार्थ एक पथक कामाला लावले.

सत्य प्रेम आंधळे हा पुणे जिल्ह्यातील महाळुंगे येथे पलायन केलेल्या मुलीसोबत भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यावरून पथकाने महाळुंगे गावी जात कारवाई करत सत्यप्रेम व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना वडवणी पोलिसांकडे सोपवण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.