‘ धक्कादायक ‘ सत्य आले बाहेर , जिवंत अर्भकाला पुरण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शेअर करा

नवजात अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न नुकताच उघडकीस आला होता. स्थानिक लोकांनी चौकशी सुरु करताच आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटना पुणे जिल्ह्यातील असून पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे तीन दिवसापूर्वी एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून झालेल्या मुलाला पुरण्याचा हा धक्कादायक प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसात प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.विशेष म्हणजे पुरण्यासाठी आलेला हा चक्क त्या मुलाचा बाप असल्याचे समोर आले आहे . Caught the main accused in the case of burying a living infant in pune district saswad police

सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 28 ऑक्टोबरला तालुक्यातील अंबोडी येथे वनविभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्ती आढळून आल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तींनी तेथून पळ काढला होता .पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा पुरावे नव्हते मात्र सी.सी.टीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सासवड येथे राहणारे अरबाज इक्बाल बागवान व अनिकेत संपत इंगवले या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज बागवान याचे 21 वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासवून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाज याने ताब्यात घेतले आणि त्याचा मित्र अनिकेत इंगोले त्याच्याबरोबर आंबोडी येथील शेतात जाऊन हे बाळ पुरण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्थानिक लोक दिसताच आणि चौकशीला सुरुवात होताच ते तिथून पळून गेले होते . सुदैवाने या बाळास वाचवण्यात यश आले आहे .

सासवड पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यामध्ये या घटनेने खळबळ उडाली होती. सासवड पोलिसांनी 48 तासात या घटनेचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतलं या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, महेश खरात, महेश उगले, राजेश खर्चे यांच्या टिमने ही कामगिरी केली.


शेअर करा