धक्कादायक .. सख्ख्या काकूच्या पाठीला आधी वाईट स्पर्श आणि मग मोबाईलवर म्हणाला की …

शेअर करा

नात्याने चुलती असलेल्या सख्ख्या काकूला दूरध्वनी करून लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच तिच्या पाठीला अश्‍लीलरीत्या स्पर्श करणाऱ्या पुण्यातील एका विकृत पुतण्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मलबार हिल येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय तक्रारदार महिला एक व्यावसायिक असून आरोपी पुतण्या हा पुण्यातील रहिवासी आहे. he touched her aunty first and then talk obscenely on her mobile pune news

दहा वर्षांपूर्वी आरोपी पुतण्याने तक्रारदार महिलेच्या मुलाजवळ त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्यामुळे त्यांनी पुतण्याशी संवाद बंद केला होता, पण सहा महिन्यांपूर्वी कुटुंबातील व्यक्तीच्या दशक्रिया विधीला आरोपी पुतण्याची पुन्हा काकूसोबत भेट झाली. त्या वेळी त्याने काकूच्या पाठीला अश्‍लील स्पर्श केला होता. हा प्रकार त्यांनी पती व जावेला सांगितला; पण दुःखाचा प्रसंग असल्यामुळे त्यांनी विषय वाढवला नाही आणि काही काळ प्रकरण शांत राहिले.

मार्चमध्ये तक्रारदार महिलेला अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला त्यावेळी त्याने आपले नाव सांगितले. पुतण्याचे यापूर्वीचे वागणे ठीक नसल्याने त्यांनी मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. त्या वेळी पुतण्याने मला तुला भेटायचे आहे. जवळीक साधायची आहे. मी तुला लाईक करतो, पुण्यात येऊन तुला भेटायची इच्छा आहे असे देखील तो फोनवर म्हणाला. पुरावा म्हणून तक्रारदार महिलेने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला.

मात्र आरोपीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही अखेर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदार महिलेने याप्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. त्या वेळी मोबाईल क्रमांकाच्या मदतीने एका व्यक्तीपर्यंत पोहोचले. आरोपी त्यांच्याकडे ड्रायव्हरचे काम करत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. त्यांच्या माहितीवरून अखेर आरोपी पुतण्याला पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरु आहे.


शेअर करा