आमच्यासाठी मशीनचे बटन कचाकचा दाबा नाहीतर.., अजित पवार काय बोलून गेले.. 

शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने चर्चेत राहणारी विधाने करत असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे बोलताना त्यांनी ‘ इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देईल पण आमच्यासाठी मशीनचे बटन कचाकचा दाबा म्हणजे मलाही निधी देता येईल नाहीतर माझा हात आखडता येईल ‘ असे म्हटलेले आहे. 

अजित पवार म्हणाले की , ‘ खासदारांनी आमच्या कामात ढवळाढवळ करू नये अशी आमदारांची किंवा आमदार होऊ इच्छिणाऱ्यांची इच्छा असते. आमचा उमेदवार कामात ढवळाढवळ करेल असे वाटत नाही. ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील ‘, असे म्हटलेले आहे.


शेअर करा