शेअर मार्केटचे ट्रेडर्स गायब झाल्याने शेकडो कुटुंबीय देशोधडीला , पुढे काय ? 

शेअर करा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठी मोठी आमिष दाखवत पाथर्डी आणि शेवगाव परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालून काही नामांकित ट्रेडर्स फरार झालेले आहेत. त्यांच्यामुळे शेकडो कुटुंब देशोधडीला लागलेले असून या ट्रेडरचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. 

जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे आणि संतोष गायकवाड हे ट्रेडर्सवर कारवाईसाठी आक्रमक झालेले असून , ‘ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पळून गेलेल्या ट्रेडरचा शोध घेण्याची गरज गुंतवणूकदारांना वाटू लागलेली आहे. आयुष्यभराची पुंजी अनेक जणांनी शेअर मार्केटमध्ये लावली. काही गुंतवणूकदारांनी तर शेतीमाल विकून , बचत गटाचे , बँकेचे पैसे घेऊन , सोने तारण करून या व्यवसायात अडकले. काहींनी ठेवीच्या पावत्या मोडल्या आणि पैसे ट्रेडरच्या हवाली केले मात्र ट्रेडर सध्या गायब झालेले आहेत .’ 

प्रांत अधिकारी , तहसीलदार तसेच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांची देखील आगामी काळात भेट घेण्यात येईल. गुंतवणूक केलेल्या व्यक्तींकडे काही डिमांड ड्राफ्ट जमा केल्याच्या पावत्या आणि इतर पुरावे देखील उपलब्ध आहेत. शेवगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे . 


शेअर करा