नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजलं आणि त्यानंतर काही मिनिटात.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील इमामवाडी इथे समोर आलेली असून एका दाम्पत्याने एकापाठोपाठ टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , शेतकरी असलेले रामदास करेवाड ( वय ३५ ) आणि त्यांच्या पत्नी वर्षा रामदास करेवाड ( वय ३० ) यांच्यात किरकोळ कारणावरून कुरबुर होत असायची. रामदास यांनी 15 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास मी शेताकडे जातो असे सांगितले आणि त्यानंतर गावाजवळ नवरंगपुरा भागात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले. 

त्यांच्या आत्महत्येचे वृत्त गावात पसरले आणि ही बाब त्यांच्या पत्नीला समजली आणि त्यांनी बापूराव संभाजी करेवाड यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले त्यात त्यांचाही मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा , एक मुलगी असा परिवार असून कंधार पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा