अन अचानक झाले एक लाख डिबेट , नगरमधील प्रकार 

शेअर करा

नगरमध्ये फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या समोर आलेला असून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. एका व्यक्तीने यानंतर भिंगार पोलिसात दाखल होत गुन्हा नोंदवलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , वाय जे याक्षित ( वय 30 वर्ष राहणार पूर्वलापल्ली तिरुपती आंध्र प्रदेश ) असे फिर्यादी तरुणाचे नाव असून तरुण हा एमआयडीसीमध्ये नोकरी करतो. सात मार्च रोजी त्यांना क्रेडिट कार्डमधून 99938 रुपयांची डिबेट झाल्याचा मेसेज आला. फिर्यादी यांनी बँकेची कुठलीही माहिती कधी कुणाशी शेअर केलेली नव्हती मात्र तरी देखील पैसे गायब झाल्यानंतर आपला डाटा चोरून हा प्रकार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

मोबाईलवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट झाल्याचा मेसेज आल्यावर फसवणूक झाल्याची त्यांची खात्री झाली आणि त्यानंतर त्यांनी भिंगार पोलिसात दाखल होत त्यांनी गुन्हा नोंदवला. 


शेअर करा