एका मल्टीस्टेटने दुसऱ्या पतसंस्थेची केली फसवणूक , काय चाललंय जिल्ह्यात ? 

शेअर करा

नगर जिल्ह्यातील सुमारे डझनभर आर्थिक संस्था सध्या अडचणीत असून त्यामध्ये नगर शहरातील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी देखील अडचणीत आल्याने तोफखाना पोलिसात संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , धोंडी शंकर राऊळ ( वय 61 राहणार सावेडी ) हे ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था येथे सचिव म्हणून कार्यरत होते. महालक्ष्मी मल्टीस्टेट सोसायटीत पैसे ठेवल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष महालक्ष्मीच्या संचालकांनी दाखवले आणि त्यानंतर ज्ञानेश्वरच्या काही संचालकांनी यास विरोध केला मात्र तरी देखील अशोक गायकवाड यांनी पदाचा गैरवापर केला आणि महालक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये वेळोवेळी सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम जमा केली. ठेवी परत करण्यास अपयश असल्याने अखेर धोंडी राऊळ यांनी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे . 

हेमा सुपेकर, अशोक गायकवाड, राहुल दामले ,मनीष कुटे,  राजेंद्र पारेख ,अजय आकडे,प्राजक्ता बोरुडे ,मच्छिंद्र खाडे ,शामराव कुलकर्णी, सुनील वाघमारे आणि शाखाधिकारी शैलेंद्र सुपेकर यांच्यावर एमपीआयडी कायद्याअंतर्गत तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा