भाजपचे ‘ दलाल ‘ असे झाले विजयी , हुकूमशहाचा खरा चेहरा समोर आला

शेअर करा

सत्तेसाठी कुठलीही मर्यादा गाठणाऱ्या भाजपने गुजरात येथील निवडणुकीत पुन्हा सत्तेचा गैरवापर करत आपल्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणलेले आहे . लोकशाहीची पूर्णपणे खिल्ली उडवत भाजपचा हा उमेदवार निवडून आलेला असून मुकेशकुमार दलाल असे या विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. 

सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप वगळता उर्वरित आठ उमेदवार रिंगणात होते त्यातील इतरांनी अर्ज मागे घेतल्याने मुकेश कुमार दलाल यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध विजय घोषित केले आणि त्यांना त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. अशाच पद्धतीने जर भाजपला काम करायचे आहे तर निवडणूक घेण्याची देखील काय गरज आहे ? अशा संतप्त प्रतिक्रिया या प्रकारानंतर नागरिक देत आहेत. 

सुरत मतदारसंघात मुकेश कुमार दलाल हे भाजपकडून तर काँग्रेसकडून निलेश कुंभानी यांनी अर्ज भरलेले होते. इतरही आठ उमेदवार रिंगणात होते व इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले मात्र काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी हे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. अचानकपणे त्यांच्या नावाचा प्रस्ताव देणाऱ्या सह्यांमध्येच घोळ झाला आणि संबधित व्यक्तींनी समोर येऊन या सह्या आमच्या नाहीत असे जाहीर केले त्यानंतर कुंभानी यांचा अर्ज बाद करण्यात आला आणि मुकेशकुमार दलाल यांना विजयी करण्यात आले. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून ,’  तानाशाह की असली ‘सूरत’ एक बार फिर देश के सामने है! जनता से अपना नेता चुनने का अधिकार छीन लेना बाबा साहेब अंबेडकर के संविधान को खत्म करने की तरफ बढ़ाया एक और कदम है। मैं एक बार फिर कह रहा हूं – यह सिर्फ सरकार बनाने का चुनाव नहीं है, यह देश को बचाने का चुनाव है, संविधान की रक्षा का चुनाव है। ‘ असे म्हटलेले आहे. 


शेअर करा