माझ्यावरील हल्ल्याची नि:पक्ष चौकशी करा, सुरज नामदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

शेअर करा

नगर शहरातील गौरीघुमट परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुरज नामदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्यानंतर सुरज नामदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक पत्र लिहून आपल्यावरील हल्ल्याची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. सुरज नामदे यांनी गौरी घुमट परिसरात शेजारी सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर कारवाईसाठी निवेदने दिल्याच्या रागातून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला होता . हल्ला होण्याआधी महापालिका प्रशासनाने त्यांचे राहते घर काही प्रमाणात उध्वस्त केले तसेच  शेजारील दारूच्या गुत्त्याच्या दुकानावर देखील काही प्रमाणात कारवाई केली होती. 

सुरज नामदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हटले आहे की ? 

मा.महोदय, मी सूरज नामदे स्वतः सीना नदी रुंदीकरण, स्वच्छता अशा अनेक महत्तवपूर्ण मुद्द्यांवर गेल्या दशकापासून लढा देत आहे.त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर कायदेशीरपणे प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारत आहे .

गौरी घुमट येथील रहिवासी परिसरात,जवळच तुळजा भवानी मंदीर,पार्वती बाई डहाणूकर शाळा, जिल्हा परिषद अंगणवाडी, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान  ईत्यादी सामजिक व शैक्षणिक संस्था असताना बबन भाऊराव आढाव याने भवानी बिर्याणी हाऊस या हॉटेलच्या नावाखाली अवैध दारुचा गुत्ता,व सट्टा,मटका, जुगार,धुम्रपान असे सर्व अवैध बेकायदेशीर धंदे चालु केले आहेत.

आढाव याच्या अवैध धंद्याचीच मी व परिसरातील सर्व नागरिकांनी तक्रार केली म्हणुन 7-8 वेळा तेथे छापे (रेड) पडले होते त्याचा राग मनात धरूनच दि.18/04/2024 व दि.19/04/2024 रोजी बबन आढाव व त्याच्या परिवारातील सदस्य व मित्र यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला.

माझ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात अराजकता पसरली असल्याचा एक पुरावाच आहे. सदर प्रशासकीय यंत्रणा गुंडशाहीने ताब्यात घेतली आहे. असे वाटत आहे. शहरातील एक प्रतिष्ठित वकील या अवैध धंद्याला पाठबळ देत आहे त्यामुळेच कारवाईला वेळ लागत आहे का ?  तर मग नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडुन ठेवायची?

कृपया सदर प्रकरणाची एक स्वतंत्र विशेष समिति नेमून लवकरात लवकर निष्पक्ष तपासणी करून गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करावी व मला व माझ्या कुटुंबाला त्याचबरोबर अहमदनगरमधील समाज सेवकांना न्याय मिळवून द्यावा ही आपणास नम्र विनंती.


शेअर करा