तब्बल तीन मुलांचे बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या अखेर ‘ असा ‘ अडकला सापळ्यात

शेअर करा

तब्बल ३ जणांचे बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या पकडण्यास अखेर वनविभागाला यश आले असून पाच जिल्ह्यातील यंत्रणा यासाठी कमी लागलेली होती. नगर जिल्ह्यात ह्या बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता आणि तब्बल तीन जणांचा बळी घेतला होता. जिल्ह्यातील पाथर्डी येथील वन परिक्षेत्राच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून याचा धुमाकूळ सुरु होता. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याने आठ दिवसात तीन मुलांना ओढून नेले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता.

बिबट्या शोध मोहीम कामी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीडची पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. गुरुवारी पहाटे आष्टी वन परिक्षेत्र हद्दीत भक्ष्याच्या शोधार्थ सावरगाव सटवाई दर्याचे पठारावर बिबट्या आला होता. पिंजऱ्यातील बोकडाचा फडशा पाडतानाच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला. The man-eating leopard was finally caught at Pathardi in Ahmednagar district

शिरापूर डोंगराच्या माथ्यावर सावरगाव (ता. आष्टी) वन विभागाची हद्द आहे. शिरापूर, पानतासवाडी, करडवाडी, सटवाईदरा ओढा, गाढवदरा परिसरात बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून वावरत होता. दरम्यानच्या काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा फडशा पाडला. भक्ष्याची वानवा झाल्याने तो मानवी वस्त्याकडे वळला होता. शेळ्या आणि लहान मुले यांना त्याने लक्ष केले होते.


शेअर करा