दोघांचे भांडण होताच प्रेयसीने ‘ अचानक ‘ घेतली नदीत उडी.. प्रियकराने काय केले ?

शेअर करा

पुलाच्यावर प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडण झाले आणि वैतागलेल्या प्रेयसीने काही कळण्याच्या आत नदीत उडी मारली. प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय प्रेयसीने कोल्हापूर येथील शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी टाकली, पाठोपाठ प्रियकरानेही नदीत उडी मारून प्रेयसीला नागरिकांच्या मदतीने वाचवले. संबंधित युवती गोकुळ शिरगाव येथील तर युवक हा पुनाळ (ता. पन्हाळा) येथील आहे. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. As soon as the two had an argument, the sweetheart jumped into the river kolhapur

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित युवक हा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत नोकरीस आहे. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे प्रेमीयुगल पन्हाळा मार्गावरून दुचाकीवरून येऊन शिवाजी पुलावर थांबले. या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे शाब्दिक वादावादी झाली. या वादातूनच संबंधित युवतीने आपल्याकडील सॅक दुचाकीला अडकून रागाच्या भरात थेट पुलावरून पंचगंगा नदीच्या पाण्यात उडी टाकली.

तिने अचानक असे केल्याने भांबावलेल्या ३० वर्षीय प्रियकरानेही पाठोपाठ पाण्यात उडी टाकली. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकडे धाव घेतली.शिवाजी चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिवाची पर्वा न करता त्यांनी वडणगे बाजूने रस्त्यावरून नदीकडे धाव घेतली. त्याचवेळी ते तोल जाऊन पडले मात्र नदीपात्रानजीक जाण्यास त्यांना यश आले.

प्रियकरानेही आपल्या प्रेयसीला पोहत पोहत पाण्यातून काठावर आणले. पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी त्या दोघांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मदतीसाठी धावलेले पोलीस कॉन्स्टेबल निळपणकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यात प्रेमीयुगुलांच्या चौकशीचे काम सुरू होते. त्यांच्या नातेवाइकांना बोलवून घेण्यात आले आहे.


शेअर करा