एडवोकेट अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करणारा ताब्यात , कोतवाली पोलिसांची कारवाई

शेअर करा

एडवोकेट अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून अशोक कोल्हे यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथून कामानिमित्त ते नगर इथे आलेले असताना त्यांचा पक्षकार असलेल्या व्यक्तीने कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. 

उपलब्ध माहितीनुसार , अनिल लक्ष्मण गायकवाड ( राहणार हनुमान मंदिराच्या पाठीमागे , गांधीनगर बोल्हेगाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गायकवाड याने काही एक कारण नसताना फिर्यादी यांच्यावर ‘ तुला आता जिवंत सोडणार नाही ‘ असे म्हणत धारदार शस्राने हल्ला केला होता त्यात कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. 

कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यानंतर कारवाई करत तात्काळ आरोपीस जेरबंद केलेले असून आरोपी गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. कोल्हे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मध्यवर्ती व शहर वकील संघटनेच्या वतीने कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे देखील अनेक पक्षकारांची गैरसोय झाल्याचे चित्र जिल्हा न्यायालयात होते. 


शेअर करा