केडगावमध्ये साडी खरेदी करण्यासाठी ‘ त्या ‘ तिघी आल्या अन, फिर्यादींची पोलिसात धाव 

शेअर करा

नगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये असलेल्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या तीन महिलांनी साड्या चोरल्याचा प्रकार समोर आलेला असून नऊ तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पूनम अभिनव उजागरे ( वय 24 वर्ष राहणार केडगाव ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून पूनम यांचे केडगाव उपनगरातील जगताप मळा इथे हिरकणी साडी दुकान आहे. तीन महिला त्यांच्या दुकानात साडी खरेदी करण्यासाठी आलेल्या होत्या मात्र फिर्यादी यांची नजर चुकवून त्यांनी सुमारे दीड हजार रुपये किमतीच्या दहा साड्या आणि दोन हजार रुपये किमतीच्या पाच साड्या चोरून नेलेल्या आहेत.


शेअर करा